भारत – दक्षिण आफ्रिका केपटाऊनमध्ये आमनेसामने

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवार ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दररोज दुपारी दोन वाजता खेळ सुरू […]

भारत – दक्षिण आफ्रिका केपटाऊनमध्ये आमनेसामने

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवार ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दररोज दुपारी दोन वाजता खेळ सुरू होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. पण सामना अनिर्णित राहिला अथवा भारताचा पराभव झाला तर कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका जिंकेल. यामुळेच भारतासाठी दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणे आवश्यक आहे.

भारताच्या गोलंदाजाला दुखापत

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या खांद्याला दुखापत झाली. फलंदाजीचा सराव करत असताना शार्दुलला ही दुखापत झाली. दुखापतीमुळे तो केपटाऊन कसोटीत खेळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शार्दुलच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.

आयसीसीने भारतावर केली कारवाई

षटके सावकाश टाकल्यामुळे अर्थात स्लो ओव्हररेटमुळे भारतावर आयसीसीने कारवाई केली. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळवलेल्या गुणांपैकी दोन गुण दंड म्हणून कमी केले. यामुळे भारताचे गुण आता १४ झाले आहेत. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार दक्षिण आफ्रिका १२ गुण आणि विजयाचे प्रमाण १०० टक्के असल्यामुळे पहिल्या स्थानावर आहे. भारत १४ गुण आणि विजयाचे प्रमाण ३८.८९ टक्के असल्यामुळे सहाव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, डीन एल्गर (कर्णधार), टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, केशव महाराज, झुबेर हमजा, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स

भारत : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, रवींद्र जडेजा , श्रीकर भारत , अभिमन्यू ईस्वरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number