भारतीय खेळाडूला झाली दुखापत

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला, भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताला दोन धक्के बसले. आधी आयसीसीने […]

भारतीय खेळाडूला झाली दुखापत

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला, भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताला दोन धक्के बसले. आधी आयसीसीने भारतावर कारवाई केली. या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताच्या खेळाडूला दुखापत झाली.

भारताच्या गोलंदाजाला दुखापत

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या खांद्याला दुखापत झाली. फलंदाजीचा सराव करत असताना शार्दुलला ही दुखापत झाली. दुखापतीमुळे तो केपटाऊन कसोटीत खेळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शार्दुलच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.

आयसीसीने भारतावर केली कारवाई

षटके सावकाश टाकल्यामुळे अर्थात स्लो ओव्हररेटमुळे भारतावर आयसीसीने कारवाई केली. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळवलेल्या गुणांपैकी दोन गुण दंड म्हणून कमी केले. यामुळे भारताचे गुण आता १४ झाले आहेत. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार दक्षिण आफ्रिका १२ गुण आणि विजयाचे प्रमाण १०० टक्के असल्यामुळे पहिल्या स्थानावर आहे. भारत १४ गुण आणि विजयाचे प्रमाण ३८.८९ टक्के असल्यामुळे सहाव्या स्थानावर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number