मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी २०२४ पासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. याआधी भाषणातून त्यांनी भुजबळांवर टीका केली. या संदर्भात प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनी संयम बाळगावा… सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ असं सांगितलं. तर छगन भुजबळ यांनी कोल्हेकुईला घाबरत नसल्याचं म्हटलं. जरांगेंच्या जन्माअगोदरपासून दादागिरीविरोधात लढतोय असंही भुजबळ म्हणाले. जरांगेंच्या भाषणात फक्त माझ्यावर टीका होती, असेही भुजबळांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या स्मरण शक्तीमध्ये गडबड आहे. ते एकाच भाषणात दुहेरी बोलतात. जरांगे हॉटेल वगैरे भुजबळांनी जाळल्याचा आरोप करतात, मराठ्यांना डाग लागल्याचं म्हणतात.ते यापूर्वी बीड सरकारी अधिकाऱ्यांनी जाळलं म्हणाले होते. आजच्याच सभेत मराठ्यांच्या वाट्याला जर गेला तर बीडला काय होतं हे लक्षात ठेवा, असं म्हणत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.