भारताला मालिका जिंकण्याची संधी

पोर्ट एलिझाबेथ, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी – २० मालिका बरोबरीत सुटली. यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत जिंकण्याची संधी भारताकडे आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा सामना […]

भारताला मालिका जिंकण्याची संधी

पोर्ट एलिझाबेथ, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी – २० मालिका बरोबरीत सुटली. यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत जिंकण्याची संधी भारताकडे आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून मालिका २ – ० अशी जिंकण्याची संधी भारताकडे आहे.

मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन , डेव्हिड मिलर, विआन मल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, लिझाड विलियम्स, काइल व्हेरेने, ओटनील बार्टमन, मिहलाली मपोंगवाना

एकदिवसीय मालिका आणि निकाल

रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – भारताचा ८ गडी राखून विजय
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number