शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर

नागपूर, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारला. विधिमंडळ प्रांगणातील कक्षात शिंदे समितीने मुख्यमंत्री शिंदे यांना अहवाल सुपूर्द […]

शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर

नागपूर, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारला. विधिमंडळ प्रांगणातील कक्षात शिंदे समितीने मुख्यमंत्री शिंदे यांना अहवाल सुपूर्द केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्मितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, शंभूराज देसाई उपस्थित होते. याआधी न्या शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number