निम्म्या कोल्हापूर शहरात सोमवारी पाणीपुरवठा खंडीत

कोल्हापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुईखडी येथील ११० केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने सोमवारी ११ डिसेंबर २०२३ रोजी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. मंगळवारी अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, […]

निम्म्या कोल्हापूर शहरात सोमवारी पाणीपुरवठा खंडीत

कोल्हापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुईखडी येथील ११० केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने सोमवारी ११ डिसेंबर २०२३ रोजी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. मंगळवारी अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसायटी, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापू रामनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकर नगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवलेमळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स, राजीव गांधी, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाष नगर पंपिंग वरील ग्रामीण भाग, पाचगाव, आरकेनगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवारनगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आरकेनगर, जरगनगरले आऊट तसेच ई वॉर्डातील संपूर्ण राजारामपुरी, शाहू मील, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, लोणार वसाहत, शाहू मील कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपूरी एक ते चार गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर येथे सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number