नौदलातील पदांना देणार भारतीय परंपरेतली नावं

सिंधुदुर्ग, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ज्याचे समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तिमान हे भारतीय राजांमध्ये सर्वात आधी शिवाजी महाराजांनी ओळखले. त्यांनी स्वतःचे आरमार अर्थात नौदल उभे केले. हे भारतीय राजाने उभे केलेले पहिले नौदल. शिवाजी महाराजांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्गमधील तारकर्ली येथे नौदल दिनानिमित्त आयोजित […]

नौदलातील पदांना देणार भारतीय परंपरेतली नावं

सिंधुदुर्ग, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ज्याचे समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तिमान हे भारतीय राजांमध्ये सर्वात आधी शिवाजी महाराजांनी ओळखले. त्यांनी स्वतःचे आरमार अर्थात नौदल उभे केले. हे भारतीय राजाने उभे केलेले पहिले नौदल. शिवाजी महाराजांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्गमधील तारकर्ली येथे नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एक मोठी घोषणा केली. नौदलातील पदांना देणार भारतीय परंपरेतली नावं देणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याआधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राजकोट किल्ल्यात झाले.

नौदल दिनाचा दिमाखदार सोहळा

मावळत्या सूर्याच्या साक्षीनं भारतीय नौदलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर सादर करण्यात आली. ही प्रात्यक्षिकं पाहून पंतप्रधान मोदींसह कोकणवासीय भारावून गेले.

दिमाखदार सोहळ्यात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

नौसेना दिनाच्या निमित्तानं सोमवारी मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे भारतीय नौदलानं यावेळी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फिटलं. नौदलानं यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number