पुणे, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिवाळी पाडव्यानिमित्त गोंविदबाग येथे पवार कुटुंबाला भेटून शुभेच्छा देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून आहे. यंदाही पवार समर्थकांची सकालपासूनच गोविंदबागेत गर्दी आहे. पण यंदाच्या दिवाळीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार हे दोघेही ऐन दिवालीत गोविंदबागेत अनुपस्थित आहेत. आत्ता नसले तरी पुढील काही तासांमध्ये अजित पवार आणि रोहित पवार […]
पुणे, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिवाळी पाडव्यानिमित्त गोंविदबाग येथे पवार कुटुंबाला भेटून शुभेच्छा देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून आहे. यंदाही पवार समर्थकांची सकालपासूनच गोविंदबागेत गर्दी आहे. पण यंदाच्या दिवाळीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार हे दोघेही ऐन दिवालीत गोविंदबागेत अनुपस्थित आहेत. आत्ता नसले तरी पुढील काही तासांमध्ये अजित पवार आणि रोहित पवार गोविंदबागेत येणार आहेत की नाही, हे अद्याप समजलेले नाही.