कुणबी प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

नाशिक, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना हिंसा करण्यात आली. राज्याच्या विशिष्ट भागांमध्ये हिंसा करण्यात आली. ठराविक व्यक्तींना लक्ष्य करून जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. विशिष्ट व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने […]

कुणबी प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

नाशिक, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना हिंसा करण्यात आली. राज्याच्या विशिष्ट भागांमध्ये हिंसा करण्यात आली. ठराविक व्यक्तींना लक्ष्य करून जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. विशिष्ट व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रकार करण्यात आले. आरक्षण मिळवण्यासाठी असे प्रकार होणार असतील तर ओबीसींना दहशत माजवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

भुजबळांच्या वक्तव्यानंतर बीडच्या हिंसाचावरून राजकारण पेटले आहे. ओबीसी नेते आणि मराठा समन्वयक आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना ‘हिंसाचाराचं समर्थन करणार नाहीच’ असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. पण मराठा आंदोलन सुरू असताना ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी जरांगे पाटील यांनी अद्याप बदलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number