नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांनी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील कठीण परिस्थिती आणि इस्रायल-हमास संघर्षावर चर्चा झाली. तणाव कमी करणे, कठीण परिस्थितीत असलेल्यांसाठी मदत, शांतता आणि सुरक्षितता यासाठी करायच्या उपायांवर दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा केली. चाबहार बंदरासह द्विपक्षीय मुद्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता, सुरक्षितता, स्थैर्य यासाठी परस्परांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय घेतला.