येवला, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मागील पाच दिवसात कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ७२५ रुपयांची घसरण झाली. कांद्याचे दर सरासरी चार हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या पाच दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे दिसून येत आहे. कांदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
कांद्याच्या सरासरी दरात ७२५ रुपयांची घसरण
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
गेल्या पाच दिवसात शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा