हार्बरवर रेल्वेचा गोंधळ कायम

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हार्बर मार्गावर रेल्वेचा गोंधळ बुधवारी पण कायम आहे. रेल्वेने हार्बर मार्गावर ४४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक सोमवारी २ ऑक्टोबर रोजी संपला तरी पुढील पाच दिवस मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० असा ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. आता या ब्लॉकमध्ये आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. […]

हार्बरवर रेल्वेचा गोंधळ कायम

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हार्बर मार्गावर रेल्वेचा गोंधळ बुधवारी पण कायम आहे. रेल्वेने हार्बर मार्गावर ४४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक सोमवारी २ ऑक्टोबर रोजी संपला तरी पुढील पाच दिवस मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० असा ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. आता या ब्लॉकमध्ये आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे रविवार ८ ऑक्टोबर पर्यंत हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. हा ब्लॉक घेतला जात असूनही दिवसभर रेल्वेचा गोंधळ सुरू असल्याचे दिसते. मंगळवार प्रमाणे बुधवारी पण हार्बर मार्गावर गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल येथे एक गाडी यार्डात रुळावरून घसरली. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. जलद आणि धीम्या दोन्ही मार्गांवरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number