उद्धव यांच्या पितृपक्षाचा निर्णय पितृपक्षानंतर

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या दावे – प्रतिदावे याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता आणखी तीन आठवड्यांनंतर होणार आहे. यामुळे उद्धव यांच्या पितृपक्षाचा निर्णय पितृपक्षानंतर होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी आमदार अपात्रतेप्रकरणी अद्याप निर्णय झाला नाही म्हणून नाराजी […]

उद्धव यांच्या पितृपक्षाचा निर्णय पितृपक्षानंतर

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या दावे – प्रतिदावे याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता आणखी तीन आठवड्यांनंतर होणार आहे. यामुळे उद्धव यांच्या पितृपक्षाचा निर्णय पितृपक्षानंतर होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी आमदार अपात्रतेप्रकरणी अद्याप निर्णय झाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. न्यायालयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

काय म्हणाले विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर ?

सर्वोच्च न्यायालयात काय झाले याबाबत माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. जोपर्यंत माहिती मला मिळत नाही आणि ती पूर्ण वाचून समजून घेत नाही तोपर्यंत मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असे महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number