‘दुष्काळग्रस्त भागांना केंद्राने मदत करावी’

गांधीनगर,२८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत तसेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या या दोन्ही मुद्द्यांबाबत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे होते. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, […]

‘दुष्काळग्रस्त भागांना केंद्राने मदत करावी’

गांधीनगर,२८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत तसेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या या दोन्ही मुद्द्यांबाबत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे होते. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित राज्याचे प्रशासक, मुख्य सचिव मनोज सौनिक देखील उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत बोलत होते.

तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करीत असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number