जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. एकनाथ खडसेंनी जळगावमधल्या आपल्या भाषणात अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पोलिसांत तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांनी मुंबईच्या वाकोला पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले.
अखेर खडसेंविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. हा महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना धडा असल्याचे दमानियांनी सांगितले.
खडसेंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असेही दमानियांनी सांगितले.