नोकरीच्या नावे विद्यार्थ्याची फसवणूक

एका नोकरी देणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी रवी कुमार अशोक कुमार शर्मा (३०) याने तक्रारदाराशी मर्चंट नेव्हीचे वरिष्ठ एचआर रिक्रूटमेंट ऑफिसर म्हणून संपर्क साधला आणि तक्रारदाराकडून व्हॉट्सअॅंपवर कागदपत्रे आणि युनिक प्लेसमेंट/सीएमएसीजीएमचे बनावट ईमेल तक्रारदाराकडे […]

नोकरीच्या नावे विद्यार्थ्याची फसवणूक

एका नोकरी देणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.

अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी रवी कुमार अशोक कुमार शर्मा (३०) याने तक्रारदाराशी मर्चंट नेव्हीचे वरिष्ठ एचआर रिक्रूटमेंट ऑफिसर म्हणून संपर्क साधला आणि तक्रारदाराकडून व्हॉट्सअॅंपवर कागदपत्रे आणि युनिक प्लेसमेंट/सीएमएसीजीएमचे बनावट ईमेल तक्रारदाराकडे मागितले.

आरोपीने ४ लाख ४७ हजार रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करवून घेतले. तक्रारदार चेन्नई येथील सीएमएसीजीएम कंपनीत पोहोचले असता तिची फसवणूक झाल्याचे समोर आले. दहिसर पोलिसांचे सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांना बँक तपशील आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपी रवीकुमार अशोककुमार शर्मा (३०) याला बेगमपूर नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number