शिवसेना कुणाची? या प्रश्नाचा निकाल कधी लागले याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी जोरदार बाजू मांडली. त्यानंतर ‘राजकीय नैतिकता महत्त्वाची’ असते असं मत सरन्यायाधीशांनी नोंदवलं. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी बुधवारी निर्णयावर वळणार गेली. ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी 7 सदस्यीय घटनापीठासमोर घेण्याची मागणी केल्यानंतर शिंदे गटाकडून याला विरोध करण्यात आला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिली, त्यामुळे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे 16 आमदाराच्या अपात्रतेचा मुद्द्यावर युक्तिवाद करताना साळवे असे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने फक्त आमदारांना उत्तर देण्यास वेळ वाढवून दिला होता. उपाध्यक्षांना त्यांचे काम करण्यापासून थांबवलेले नव्हते, असे न्यायालयात सांगितले.
त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंची हीच चूक हरिश साळवे यांनी घेरली असून युक्तिवादात मांडत आहेत. एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटलं की त्यांच्याकडे बहुमत नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानेच सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं हरिश साळवे यांनी सांगितलं.