जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सध्या सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे.