खासदार उदयनराजे यांनी घेतली अभिनेते सयाजी शिंदेंची भेट

सातारा, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  सातारा शहरातील एका खाजगी रूग्णालयामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले सध्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी साताऱ्यातील सयाजी […]

खासदार उदयनराजे यांनी घेतली अभिनेते सयाजी शिंदेंची भेट

सातारा, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  सातारा शहरातील एका खाजगी रूग्णालयामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले सध्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी साताऱ्यातील सयाजी शिंदे यांच्या घरी ते गेले होते. त्यावेळी मित्र असावा तर सयाजीसारखा असे उद्गार काढत सयाजी शिंदे यांच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number