समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निमगाव जवळ समृध्दी महामार्गावर अपघात झाला आहे. अज्ञात ट्रकने चारचाकीला धडक दिली. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. कल्याण येथील एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह रायपूरला जात असताना हा घात झाला. चारचाकीत पती, पत्नी आणि दोन लहान मुले होती. सकाळी […]

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निमगाव जवळ समृध्दी महामार्गावर अपघात झाला आहे. अज्ञात ट्रकने चारचाकीला धडक दिली. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. कल्याण येथील एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह रायपूरला जात असताना हा घात झाला. चारचाकीत पती, पत्नी आणि दोन लहान मुले होती. सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुलढाण्याचे मनसे नेते अमोल रिंढे यांनी पोलिसांना जखमींची माहिती देत मदत केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number