सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला सर्वच ठिकाणी जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान अहमदनगरच्या दक्षिण भागात आता प्रचाराला अधिक रंगत येऊ लागलीये . या भागातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान आता त्यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुजय विखे पाटील यांना […]

सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला सर्वच ठिकाणी जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान अहमदनगरच्या दक्षिण भागात आता प्रचाराला अधिक रंगत येऊ लागलीये . या भागातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान आता त्यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप कामोठेतील सभेत लावण्यात आली. या क्लिपमधील शिव्या देणारा व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा नीलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ‘कितीही गोळ्या झाडा , मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. ४ जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे विखे म्हणाले.

पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशदीत आयुष्य जगलं, मात्र आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचे सुजय विखे पाटीलांनी पनवेल येथे झालेल्या सभेत सांगितले. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number