महाडमध्ये पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपी जेरबंद

महाड, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : रायगडमधील महाड शहरातील बाजारपेठेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व घटनाक्रम शहरातील तांबट आळी येथील आण्णासाहेब सावंत अर्बन बँकच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचत तीन तासात संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाड शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू असताना एका नवीन […]

महाडमध्ये पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपी जेरबंद

महाड, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : रायगडमधील महाड शहरातील बाजारपेठेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व घटनाक्रम शहरातील तांबट आळी येथील आण्णासाहेब सावंत अर्बन बँकच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचत तीन तासात संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

महाड शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू असताना एका नवीन घटनेची भर पडली आहे. शहरातील बाजार पेठेत संध्याकाळच्या वेळी गर्दी असते मात्र अशावेळी एटीएम फोडण्यात आले. सदर घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले. त्यानंतर केवळ तीन तासात संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम शहर पोलिसांनी केला आहे तसेच पोलिस प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे आरोपींवर कारवाई करण्यात आली.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number