मुंबई, ८ मार्च २०२४ : मुंबईमधील बोरिवली पूर्वे भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे प्लास्टिक जंगलात कुठेही टाकून दिले जाते. त्यामध्ये आदिवासी पाड्यातील लोक कचरा टाकत असलेल्या ठिकाणी जंगलातील हरीण आणि इतर वन्य प्राण्यांकडून प्लास्टिक खात असल्याचा एक व्हिडिओ कैद करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्लास्टिक नेण्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक आढळून येत असून जंगलातील हरीण आणि इतर वन्य जीव हे प्लास्टिक खाताना दिसून आले आहेत. मात्र हे प्लास्टिक निसर्ग आणि वन्य जीवांसाठी धोकादायक आहेत. अशातच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुरक्ष रक्षकाकडून पर्यटकांची तपासणी करताना हलगर्जीपणा होतोय का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रकरणात लक्ष घालून कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे.