गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील नाराज ?

जळगाव, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जातंय. पण महत्त्वाकांक्षेतून काही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदांमुळे नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. आम्ही बंड केल्यामुळेच भाजपा सत्तेत आहे… राम मंदिर ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही… अशी वक्तव्य […]

गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील नाराज ?

जळगाव, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जातंय. पण महत्त्वाकांक्षेतून काही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदांमुळे नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. आम्ही बंड केल्यामुळेच भाजपा सत्तेत आहे… राम मंदिर ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही… अशी वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केली आहेत. महायुतीच्या मेळाव्यातील गुलाबरावांच्या या वक्तव्यांमुळे ते नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तर बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजपाने दुर्लक्ष केलं अशा शब्दात शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘घटक पक्ष म्हणजे बँडवाला नाही’

घटक पक्ष म्हणजे बँडवाला नाही… मुंगीसुद्धा हत्तीला पराभूत करू शकते… निवडणुका आल्यावरच आमची आठवण येते, लग्न ठरल्यावरच बँडवाल्याची आठवण येते, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी भाजपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number