मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. वरुण आणि लावण्याचा लग्न सोहळा इटली येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी त्यांच्या कुटुंबासह काही खास मित्रपरिवार उपस्थित होते. इटलीतील टस्कनी येथील बोर्गो सॅन फेलिस येथे हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याने लग्न केलं. याच ठिकाणी विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालं होतं.
सध्या वरुण आणि लावण्याच्या लग्नाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ साड्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये वरुण मोती कलरच्या पेहेरावात दिसत आहे तर लावण्याने लाल रंगाचा जोडा परिधान केला आहे. ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. वरुण तेज हा ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा भाचा आहे. तर अभिनेता राम चरण, अल्लू अर्जुन, अल्लू सिरिश, साई तेज आणि पंजा वैष्णव तेज हे सर्व त्याचे चुलत भाऊ आहेत.वरुणच्या लग्नात या सगळ्यांनी त्यांच्या लग्नाला आवर्जून हजेरी लावली होती आणि नवविवाहित जोडप्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.