जालना, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली अंतिम मुदत २४ तारखेला संपत आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारी मराठा बांधवांचा महासंवाद मेळावा होत असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी तब्बल तीनशेहून अधिक एकारावर क्षेत्र मोकळं करण्यात आले आहे. या सभेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. जवळपास २५ ते ३० लाख मराठा बांधव उपस्थित असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी संपूर्ण सुविधा करण्यात आलेली आहे.