राऊतांची सुरक्षा वाढवली

जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले आहे. तसंच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून राऊत नाशिकमध्ये आले आहेत. दरम्यान बुधवार रोजी ते सिन्नर कडे जात आहे. संजय राऊत यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी थेट मुंबई पोलिस […]

राऊतांची सुरक्षा वाढवली

जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले आहे. तसंच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून राऊत नाशिकमध्ये आले आहेत. दरम्यान बुधवार रोजी ते सिन्नर कडे जात आहे.

संजय राऊत यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होतं. त्यांनी पत्रात श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राज ठाकूर यांना सुपारी दिली असा आरोप केला होता. दरम्यान जीवे मारण्याच्या धमकीनंतर नंतर राऊतांची सुरक्षा वाढवली आहे. नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांना पोलीस सुरक्षा दिली आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून त्या पत्राची दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्यात आला. ठाण्याचे एसीपी संजय राऊत यांचा भेटीला नाशिकमध्ये पोहोचले. ठाणे पोलिसांच्या 6 जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचले होते. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number