‘क्रूरकर्मा औरंग्याचा राष्ट्रवादीला पुळका कशाला ?’

महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेबाच्या नावाने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रोज नवा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच धारेवर धरलं आहे. भाजप नेते राम कुलकर्णी यांनी ५राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले राम कुलकर्णी, ” ज्या औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना यांची निर्घृण […]

‘क्रूरकर्मा औरंग्याचा राष्ट्रवादीला पुळका कशाला ?’

महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेबाच्या नावाने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रोज नवा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच धारेवर धरलं आहे. भाजप नेते राम कुलकर्णी यांनी ५राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राम कुलकर्णी, ” ज्या औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना यांची निर्घृण हत्या केली, त्यामुळे तो औरंगजेब आमच्या सर्वांसाठी मानवतेचा हत्यारा आहे. परंतु औरंगजेब हा राष्ट्रवादी पक्षाला आदर्श वाटतो. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी यांना राष्ट्रवादी मार्फ़त जे पत्र लिहिले गेले. त्या पात्रात राष्टवादीकडून औरंगजेब याचा उल्लेख सम्राट औरंगजेब असा करण्यात आला आहे.

या प्रकरणावरून जयंत पाटील यांना खडसून प्रश्न विचारला आहे. की तुमच्यासाठी जर औरंगजेब आदर्श असेल तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे नाव औरंगजेब राष्ट्रवादी पक्ष असे नाव ठेवावे अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला सांगावे की राष्टवादी पक्षासाठी सम्राट औरंगजेब आदर्श आहे.” अशा शब्दात राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना खडसावले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number