पुजाऱ्यांना बनवेगिरी भोवली

त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांना बनवेगिरी भोवली त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या ज्योतिर्लिंगाभोवती बर्फाचा गोळा आढळून आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या व्हिडिओची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा झाली होती. भाविक भक्त अमरनाथ बाबाचा आशिर्वाद या भावनेने या घटनेकडे पाहत होते. दरम्यान आता या व्हिडिओ मागील सत्य आता समोर आले आहे आणि हे सत्य अत्यंत खळबळजनक आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तीन […]

पुजाऱ्यांना बनवेगिरी भोवली

त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांना बनवेगिरी भोवली त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या ज्योतिर्लिंगाभोवती बर्फाचा गोळा आढळून आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या व्हिडिओची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा झाली होती. भाविक भक्त अमरनाथ बाबाचा आशिर्वाद या भावनेने या घटनेकडे पाहत होते. दरम्यान आता या व्हिडिओ मागील सत्य आता समोर आले आहे आणि हे सत्य अत्यंत खळबळजनक आहे.

याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती आणि चौकशीनंतर हा बर्फ काही पुजाऱ्यांनीच हा बर्फ येथे आणून टाकल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत त्यासोबतच भाविक संताप व्यक्त करत आहेत. प्रकरणाच्या चौकशीनंतर भाविकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या तीन पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. त्यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली. या समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. समितीच्या अहवालानंतर तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रश्वी आसराम यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुजारी सुशांत यांनी स्वत: पिशवीत बर्फ नेऊन ते पिंडीवर ठेवल्याचे व त्यावर बेलपत्र ठेऊन त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number