देशात महागाईने नागरीकांना पुरतं हैरान करून सोडलं आहे. प्रचंड महागाई आणि बेरोजगारीने नागरिकांना मनस्ताप दिला आहे. सध्या रोजच्या जीवनामध्ये सर्वात जास्त उपयोगात येणारी गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडर आहे. आपण पाहिलं तर गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच बजेड कोलमडलं आहे. महागाई सोडून राज्यातले राजकारणी इतर विषयात जास्त लक्ष देत आहे पण त्यांना महागाई विरोधात कोणी बोलण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. आजच्या जीवनात जर पाहिलं तर सामान्य नागरीक या महागाईमुळे प्रचंड वैतागला आहे.
तुम्ही पाहीलं असेलच की महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी,गॅस सिलेंडर या सर्व गोष्टींचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे पुण्यात गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात शनिपार मंदीर मंडई जवळ, हनुमानास साकडे घालून आणि महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन केल आहे. या आंदोलनात सुप्रियासुळेंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या आधी देखील अशी बरीचं आंदोलनं महागाई विरोधात करण्यात आली आहे परंतू आता या आंदोलनामुळे काही महागाई कमी होणार का प्रश्न आहे देखील आहेच.