नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित लग्न सोहळा आज शुभ मंगलसावधानच्या मंत्रोच्चारात पार पडला… मुस्लिम आणि हिंदू परिवाराचा विवाह सोहळा मोठया थाटामाटात साजरा झाला, गेल्या दोन महिन्यांपासून खान आणि आडगावक परिवारातील हा विवाह पुरोहित आणि हिंदुत्ववादी सांघटनांच्या विरोधामुळे देशभर चर्चिला गेला होता.
या विवाह सोहळ्याला हिंदुत्ववाद्यानी विरोध केल्याने हा विवाह रद्द झाला अशाही वावड्या उठविण्यात आल्या, मात्र आज या दोनही परिवाराने पुरोहितांच्या धमक्यांना न जुमानता हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे वैदिक मंत्रघोषात हा विवाह सोहळा पार पाडला या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रहार संघटणेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्तीती लावत या सोहळ्याला पाठींबा दिला.तर या सोहळ्या नंतर या कुटुंबानेही समाधान व्यक्त केले.