राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी भाषणात विरोधकांवर निशाणा साधला आहे. अशातच, त्यांना फडणवीसांनी केलेल्या १४ ट्विट्सबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी एका शब्दात उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, फडणवीसांच्य ट्विट्सचा आनंद घेतो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होते. तसेच राष्ट्रवादी हे समाजातील सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. तर या पक्षाची नीती एका जातीची नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील भारनियमनाबद्दल विरोधक राज्य सरकारव टीका करत आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले, विजेच्या प्रश्नांकडे राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहेत. तसेच केंद्र सरकार आपल्या सत्येचा दुरुपयोग करत असून सत्येत नसणाऱ्यांना काही तरी निर्णय घेण्याचे प्रकार राजकारणात वाढत असल्याचेही पवारांनी सांगितले आहे.
जळगाव दौऱ्यात शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीसंनी केलेल्या १४ ट्विट्सबद्दल पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावर पवार म्हणाले, मी फडणवीसांच्या ट्विट्सचा आनंद घेत आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.