‘मविआ नेते तपास यंत्रणांना उत्तर देण्यात असमर्थ’ – आशिष शेलार

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मलिकांच्या ईडी चौकशीवरून राजकारण ढवळून निघाले असून अनके आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मविआ नेते तपास यंत्रणांना उत्तर देण्यास असमर्थ असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच भाजपकडून सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून […]

‘मविआ नेते तपास यंत्रणांना उत्तर देण्यात असमर्थ’ – आशिष शेलार

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मलिकांच्या ईडी चौकशीवरून राजकारण ढवळून निघाले असून अनके आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मविआ नेते तपास यंत्रणांना उत्तर देण्यास असमर्थ असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच भाजपकडून सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादीने दबाव आणू नये. आपल्या सरकारला, पक्षाला वाचविण्यासाठी यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवेसना-राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. महाविकास आघाडी नेते तपास यंत्रणांना उत्तर देण्यास असमर्थ असून तपास यंत्रणा लवकरच सत्य समोर आणणार आहे, असा विश्वास आशिष शेलारांनी दाखवला आहे.

पुढे ते म्हणाले, ईडीने कोणतीही कारवाई केली, तर प्रत्येकजण भाजपलाच जबाबदार धरते हे चुकीचे आहे. शिवसेना-राष्ट्रवादी दहशतवाद्यांना समर्थन करत आहे का? असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो, असेही ते म्हणाले.

नवाब मलिकांची ईडीकडून पहाटेपासून चौकशी सुरू असून आशिष शेलारांनी ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला आहे. शेलारांनी ट्विट केले की, ‘मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी! ज्यानं खीर खाल्ली नाही, त्यानं घाबरण्याचं कारणही नाही, पण ज्यानं-ज्यानं खीर खाल्ली, त्यानं कितीही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच’, असे त्यांनी ट्विट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number