Congress Rally Against SIR: ‘मतचोरी’च्या आरोपांवर काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली

या रॅलीत काँग्रेस सरकार आणि निवडणूक आयोगावर संगनमताचे आरोप करणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत.

Congress Rally Against SIR: ‘मतचोरी’च्या आरोपांवर काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली

Congress Rally Against SIR: निवडणूक प्रक्रियेत कथित हेराफेरी आणि ‘मतचोरी’च्या आरोपांविरोधात काँग्रेसने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दिल्लीतील रामलीला मैदानावर पक्षाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत काँग्रेस सरकार आणि निवडणूक आयोगावर संगनमताचे आरोप करणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत. तसेच प्रियांका गांधी वाड्रा, के.सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘मतचोरी’विरोधात 55 लाख स्वाक्षऱ्या

काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाने देशव्यापी मोहिमेद्वारे ‘मतचोरी’च्या विरोधात सुमारे 55 लाख स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. राहुल गांधी यांनी पुराव्यांसह मतचोरी कशी होते हे उघड केले आहे. त्यांनी या मुद्द्यावर गृहमंत्र्यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. मात्र सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही, असे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.  

हेही वाचा – Crime News: पत्नीच्या त्रासाला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

राष्ट्रपतींना निवेदन देणार

रॅलीनंतर काँग्रेसकडून राष्ट्रपतींची भेट घेऊन 55 लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर करण्याची विनंती करण्यात येणार आहे. लोकशाही आणि निष्पक्ष निवडणुकांचे रक्षण हाच या आंदोलनाचा उद्देश असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. निवडणूक सुधारणा आणि मतदार याद्यांच्या विशेष सघन सुधारणा (SIR) विषयावर लोकसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद झाल्यानंतर काही दिवसांतच ही रॅली होत आहे. काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा – Parrot News : अडीच लाखांच्या पोपटाने घेतला मालकाचा जीव, कशी घडली दुर्दैवी घटना?

लाखोंच्या उपस्थितीचा दावा

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी रॅलीला लाखो लोक उपस्थित राहतील असा दावा केला आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि महाआघाडीतील घटक पक्षांचे नेतेही या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसल्याचा आरोप करत रॅलीत “मत चोर गड्डी सोड” ही घोषणा दिली जाणार असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजप आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे लोकशाही कमकुवत करत असल्याचा आरोप केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number