राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात तिढा कायम आहे. शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी निवडणूक लढणार नसल्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. दरम्यान, संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला आले आहेत. या भेटीआधी, संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे छत्रपतींच्या घराण्याच्या सन्मान करतील, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.
संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाली असून पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतली, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, संभाजी राजे यांनी शिवसेनेतून राज्यसभेची जागा लढण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे राऊतांनी मांडला आहे. मात्र, संजय राऊत यांच्यावर संभाजीराजे समर्थक नाराज झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीरजे यांना शिवसेनेत येण्यासाठी संजय राऊतांकडून आग्रह होत असल्याने संभाजीराजे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच संभाजीराजे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश न केल्यास सायंकाळपर्यंत शिवसेना राज्यसभेसाठी सहाव्या उमेदवार जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी पक्षात प्रवेश केला नाही तर राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारासाठी शिवसेनेकडून कोणाच्या नावाची घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.