Is your watermelon safe? : सावधान! कलिंगड खातायं? ते कृत्रिमरित्या पिकवलंय की नैसर्गिकरित्या जाणून घ्या; अन्यथा होतील दुष्परिणाम

विक्रेते कलिंगड अधिक लाल दिसावे यासाठी त्यात घातक रसायने आणि इंजक्शन्स टोचतात. अशा रसायनांमुळे शरीराला फायदा होण्याऐवजी गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका उद्भवू शकतो.

Is your watermelon safe? : सावधान! कलिंगड खातायं? ते कृत्रिमरित्या पिकवलंय की नैसर्गिकरित्या जाणून घ्या; अन्यथा होतील दुष्परिणाम

Is your watermelon safe? : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे कलिंगड सध्या जीवघेणे ठरू लागले आहे. मुंबईतील पायधुनी भागात एकाच कुटुंबातील चौघांचा विषबाधेमुळे झालेला मृत्यू ही धोक्याची घंटा मानली जात आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने या कुटुंबाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला आणि दुर्दैवाने पती, पत्नी व दोन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेने फळांमधील रसायनांच्या वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विक्रेते कलिंगड अधिक लाल दिसावे यासाठी त्यात घातक रसायने आणि इंजक्शन्स टोचतात. अशा रसायनांमुळे शरीराला फायदा होण्याऐवजी गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका उद्भवू शकतो. 'FSSAI' ने कलिंगडातील भेसळ ओळखण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.

कलिंगड खरेदी करताना 'या' 3 गोष्टी नक्की तपासा:
1. टिशू पेपरची छोटी चाचणी (Tissue Paper Test)
दुकानदार जेव्हा कलिंगड कापून दाखवतो, तेव्हा त्याच्या लाल भागावर एक पांढरा टिशू पेपर ठेवा. जर त्या कागदाला लाल किंवा गडद नारंगी रंग लागला, तर समजा त्यात कृत्रिम रंग वापरला आहे. नैसर्गिक कलिंगडामुळे कागदाचा रंग बदलत नाही.

2. पाण्याची चाचणी (The Water Trick)
कलिंगडाचा एक छोटा तुकडा किंवा फोड एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाका. जर पाण्याला काही मिनिटांतच लाल रंग आला, तर ते कलिंगड रासायनिक रंगाने भरलेले आहे. खऱ्या कलिंगडामुळे पाण्याचा रंग स्वच्छ राहतो.

3. नैसर्गिक खुणा तपासा (Natural Signs)
कलिंगड निवडताना त्याच्या रंगावरूनही अंदाज बांधता येतो.  नैसर्गिकरित्या पिकवलेल्या कलिंगडाचा देठ वाळलेला आणि पिवळसर असतो. कलिंगडाच्या बुडाशी मोठा पिवळा ठिपका असतो, जो ते जमिनीवर नैसर्गिकरीत्या पिकल्याचे लक्षण आहे. कृत्रिमरित्या पिकवलेलं कलिंगडाचा देठ एकदम हिरवा असतो, बुडाशी पांढरा ठिपका असतो आणि बिया पूर्णपणे पांढऱ्या असूनही फळ मात्र आतून गडद लाल असते.

हेही वाचा – Food Poisoning Prevention: सावधान! 'हे' विसंगत पदार्थ एकत्र खाणं ठरू शकतं जीवघेणं; अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी घ्या ही खबरदारी

रसायनांमुळे फूड पॉयझनिंगचा धोका
कलिंगड लवकर पिकवण्यासाठी आणि त्याचा गोडवा वाढवण्यासाठी अनेकदा 'इरिथ्रोसिन' सारख्या रंगांचा आणि साखरेच्या पाकाचा वापर होतो. ही रसायने पोटात गेल्यावर फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होऊन अवयवांचे कार्य निकामी होऊ शकते. त्यामुळे केवळ बाहेरून चमकणारे फळ न घेता, वरील चाचण्या करूनच आरोग्यदायी फळांची निवड करा.

Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number