Weather Update : वादळ-वृष्टीचं महा-संकट! IMD चा मोठा अलर्ट जारी; महाराष्ट्रातही चिंता वाढली

राज्यात गेल्या काही दिवसांपसून थंडीचे वारे वाहू लागले आहेत. असं असताना देखील अनेक राज्यांमध्ये पावसाचे अंदाज देखील वर्तावले जात आहेत. राज्यातील हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे.

Weather Update : वादळ-वृष्टीचं महा-संकट! IMD चा मोठा अलर्ट जारी; महाराष्ट्रातही चिंता वाढली

राज्यात गेल्या काही दिवसांपसून थंडीचे वारे वाहू लागले आहेत. असं असताना देखील अनेक राज्यांमध्ये पावसाचे अंदाज देखील वर्तावले जात आहेत. राज्यातील हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे. अशातच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे.

यावेळी दक्षिण भारतातील वातावरण पाहायला गेलं तर, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांवर पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पश्चिम आणि मध्य भारतात तापमानात घट होणार असून पश्चिम मध्य प्रदेशात थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मागील काही दिवसांपासून उत्तरेकडून थंड वारे येत होते.

हेच नाही तर थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला. उत्तर भारतात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड या भागात तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यातील सुरूवातीच्या पाऊसानंतर राज्यभरात गारठा सुरू झाला. त्यामध्येच आता परत एकदा राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग बघायला मिळत आहेत. रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.हवामान तज्ञांच्या मते, एकाच वेळी तीन प्रमुख चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number