Attack on CJP: स्वतःच फोडल्या गाड्या, महिलांशी गैरवर्तन केलं… शाळा पाहणीदरम्यान CJP कार्यकर्ते अन् गावकऱ्यांमध्ये जुंपली

सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह इतर सदस्यांवर झालेल्या या हल्ल्यासाठी सुरुवातीला स्थानिक गावकऱ्यांना जबाबदार धरले जात होते.

Attack on CJP: स्वतःच फोडल्या गाड्या, महिलांशी गैरवर्तन केलं… शाळा पाहणीदरम्यान CJP कार्यकर्ते अन् गावकऱ्यांमध्ये जुंपली

Attack on CJP: राजस्थानमधील जयपूर येथे शुक्रवारी एका शासकीय विद्यालयाच्या पाहणीदरम्यान कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या प्रतिनिधी मंडळावर झालेल्या हल्ल्यावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह इतर सदस्यांवर झालेल्या या हल्ल्यासाठी सुरुवातीला स्थानिक गावकऱ्यांना जबाबदार धरले जात होते. मात्र, हा हल्ला सामान्य नागरिकांनी केला नसून तो भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून घडवून आणल्याचा गंभीर आरोप सीजेपीने केला आहे. दुसरीकडे, या सर्व आरोपांनंतर आता स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत.

‘कार्यकर्त्यांनीच केली स्वतःच्या वाहनांची तोडफोड’
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे सदस्य गावात आले असता त्यांना सुरुवातीला अत्यंत शांततेने आणि समजूतदारपणा दाखवून परत पाठवण्यात आले होते. मात्र, काही वेळातच 50 ते 60 लोकांचा गट लाठ्या-काठ्या आणि शस्त्रास्त्रांसह गावात पुन्हा धडकला. जेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी उद्धट वर्तन केले आणि गावकऱ्यांना भडकवले. ग्रामस्थांचा असाही दावा आहे की, सीजेपीच्या लोकांनी स्वतःच काठ्यांचा वापर करून स्वतःच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आणि गावकऱ्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला.

देशविरोधी घोषणाबाजी आणि राजकारणाचा प्रयत्न
स्थानिक नागरिक लाल चंद शर्मा यांनी आरोप केला की, याआधी दिल्लीतील आंदोलनादरम्यान सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. गावातही तशाच प्रकारची घोषणाबाजी करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला गेला. गावातील शाळेसाठी आधीच सरकारी निधी मंजूर झाला असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठीच हे लोक गावात मुद्दाम वाद निर्माण करायला आले होते, असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा – Anganwadi Sevika: पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच प्रशासनाची कारवाई; निलंबनानंतर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला असंतोष

परदेशी निधी आणि देशद्रोहाचा आरोप
सीजेपी हा एक देशविरोधी गट असून त्याला बाहेरील (परदेशी) यंत्रणांकडून निधी मिळतो, असा गंभीर दावा ग्रामस्थांनी केला आहे. देशाशी गद्दारी करणाऱ्या कोणत्याही घटकाला किंवा पक्षाला गावात पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number