PM Modi Uzbekistan Visit: पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान; ताश्कंदमध्ये युरेनियम पुरवठ्यासह महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी

ताश्कंद येथे आयोजित एका विशेष समारंभात उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करून गौरवले.

PM Modi Uzbekistan Visit: पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान; ताश्कंदमध्ये युरेनियम पुरवठ्यासह महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी

PM Modi Uzbekistan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवी ऐतिहासिक दिशा मिळाली आहे. ताश्कंद येथे आयोजित एका विशेष समारंभात उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करून गौरवले. या सोहळ्यापूर्वी दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांमध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. यामध्ये आर्थिक सहकार्य, तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार आणि धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. भारत आणि उझबेकिस्तानमधील संबंधांना आता ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

युरेनियम पुरवठा, समन्वय परिषद अन् संयुक्त आयोगाचा दर्जा वाढवला

द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देशांनी सहकार्याचे नवे दालन उघडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परस्पर सहकार्याला अधिक गती देण्यासाठी परराष्ट्र मंत्री स्तरावर एक विशेष समन्वय परिषद स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, उभय देशांमधील संयुक्त आयोगाचा दर्जा आता सचिव स्तरावरून थेट मंत्री स्तरावर वाढवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी उझबेकिस्तानकडून युरेनियम पुरवठ्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करण्यावर दोन्ही देशांचे ऐक्य झाले आहे. याशिवाय, दोन्ही देशांतील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणण्यासाठी एका संयुक्त व्यापार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा – Nepal Flood: आईला वाटलं मुलगा महापुरात वाहून गेला… पण 8 वर्षांच्या चिमुकल्याने झाडावर चढून वाचवला जीव

‘सिस्टर-सिटी’ करार, GIFT City चे निमंत्रण अन् भारताच्या प्रगतीचे कौतुक

या ऐतिहासिक दौऱ्यात 3 ‘सिस्टर-सिटी’ आणि ‘सिस्टर-स्टेट’ करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उझबेकिस्तानमधील ‘न्यू ताश्कंद’ आणि भारतातील गुजरात येथील ‘गिफ्ट सिटी’ या आधुनिक प्रकल्पांमधील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचा अभ्यास करण्यासाठी उझबेकिस्तानच्या शिष्टमंडळाला भारताने विशेष निमंत्रण दिले आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांनी भारताच्या आर्थिक विकासाचे, माहिती तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अंतराळ संशोधनातील असाधारण प्रगतीचे भरभरून कौतुक केले. जागतिक पटलावर भारताचा आवाज आणि प्रभाव अधिक बळकट होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number