Road Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; एक्सप्रेसवेवर ट्रकला पिकअपची भीषण धडक; 6 भाविकांचा मृत्यू, 14 जखमी

या भीषण अपघातात 3 महिलांसह 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 14 पेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

Road Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; एक्सप्रेसवेवर ट्रकला पिकअपची भीषण धडक; 6 भाविकांचा मृत्यू, 14 जखमी

KMP Expressway Accident: हरियाणातील कुंडली-मानेसर-पालवल (KMP) या द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम आणि सालासर बालाजीचे दर्शन घेऊन उत्तर प्रदेशातील मथुरेकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव पिकअप वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 महिलांसह 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 14 पेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. सर्व बाधित हे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने निष्पाप जीवांचा बळी 

पोलीस व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी धार्मिक यात्रेसाठी निघालेले हे भाविक सोमवारी संध्याकाळी राजस्थानमधील देवदर्शन आटोपून पुढील प्रवासासाठी निघाले होते. मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास केएमपी एक्सप्रेसवेवरून जात असताना, चालकाला अचानक डुलकी आल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकावर जाऊन धडकली. अपघाताचा जोरदार आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तातडीने पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी पलवल येथील जिल्हा नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – Aghori Video Viral: मृतदेहाची राख तोंडाला फासली.. जळत्या चितेसमोर तलवार अन् मानवी मांस.. अघोरी तृतीयपंथी साधकाच्या कृत्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप

एक्सप्रेसवेवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांमध्ये विजय सिंग, राजकुमार, रेश्मा देवी, कमला देवी, सुधा आणि महेश अशी 6 भाविकांची नावे निष्पन्न झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एक्सप्रेसवेवर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे आणि चालकांच्या थकव्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, या घटनेने महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number