Accidental Shooting : वाराणसी विमानतळावर सिक्युरिटी चेकिंगदरम्यान थरार; प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक सुटलेल्या गोळीने महिला कर्मचाऱ्यासह 2 जण जखमी

मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या परवानाधारक शस्त्राची तपासणी केली जात असताना, अचानक पिस्तुलातून गोळी झाडली गेली.

Accidental Shooting : वाराणसी विमानतळावर सिक्युरिटी चेकिंगदरम्यान थरार; प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक सुटलेल्या गोळीने महिला कर्मचाऱ्यासह 2 जण जखमी

Accidental Shooting : वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोठी दुर्घटना घडली. मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या परवानाधारक शस्त्राची तपासणी केली जात असताना, अचानक पिस्तुलातून गोळी झाडली गेली. ही गोळी प्रथम जमिनीवर आदळली आणि त्यानंतर तिचे छर्रे उडून तिथे उपस्थित असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना गंभीररीत्या लागले. यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश असून, अचानक झालेल्या या प्रकारामुळे विमानतळाच्या सिक्युरिटी एरियात काही काळ मोठ्या प्रमाणावर घबराट व गोंधळ उडाला होता.

अधिकृत घोषणा केली; पण तपासणीवेळी घडला दुर्दैवी प्रकार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आझमगड येथील रहिवासी असलेला एक प्रवासी आपल्या पत्नीसह एअर इंडियाच्या IX-1810 या विमानाने मुंबईच्या दिशेने प्रवास करणार होता. नियमानुसार प्रवाशाकडे पिस्तूल आणि मॅगझिन असल्याने त्याने विमानतळ प्राधिकरणाकडे शस्त्राबाबतची अधिकृत घोषणा (डिक्लेरेशन) केली होती. सुरक्षा तपासणी प्रक्रियेदरम्यान शस्त्राची सखोल तपासणी सुरू असतानाच अचानक पिस्तूल अनलॉक होऊन गोळी सुटली. 16 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 9:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Mumbai Navy Sailor Family : एकीकडे देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तर मुंबईत नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

सुरक्षा यंत्रणा अलर्ट; जखमींची प्रकृती स्थिर
गोळी लागल्यामुळे AAICLAS (Airport Authority of India Cargo Logistics and Allied Services) चे 2 स्क्रीनर्स जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. वाराणसी विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता यांनी स्पष्ट केले की, घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून स्थानिक पोलिसांना याबद्दल तात्काळ पाचारण करण्यात आले आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number