Drishyam 3: ‘यश त्याच्या डोक्यात गेलयं…’; अक्षय खन्नाच्या दृश्यम 3 मधून बाहेर पडण्यावर निर्माते कुमार मंगत यांचा संताप

अक्षय खन्नाने या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने निर्माते कुमार मंगत पाठक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. &quotयश अक्षयच्या डोक्यात गेले आहे,&quot अशा शब्दांत त्यांनी आपले मौन सोडले आहे.<br/>

Drishyam 3: ‘यश त्याच्या डोक्यात गेलयं…’; अक्षय खन्नाच्या दृश्यम 3 मधून बाहेर पडण्यावर निर्माते कुमार मंगत यांचा संताप

Drishyam 3: बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत असला तरी, दुसऱ्या बाजूला 'दृश्यम 3' (Drishyam 3) या बिग बजेट चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने निर्माते कुमार मंगत पाठक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "यश अक्षयच्या डोक्यात गेले आहे," अशा शब्दांत त्यांनी आपले मौन सोडले आहे. कुमार मंगत पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटासाठी अक्षय खन्नासोबत अधिकृत करार झाला होता आणि त्याचे मानधनही निश्चित झाले होते. मात्र, वादाची ठिणगी 'विग'वरून पडली. अक्षयला चित्रपटात विग वापरायचा होता, परंतु दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी सातत्य (Continuity) राखण्यासाठी त्याला नकार दिला. सुरुवातीला अक्षयने हे मान्य केले, पण नंतर पुन्हा विगचा आग्रह धरला आणि अचानक चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

निर्मात्यांचे गंभीर आरोप

निर्मात्यांनी अक्षयच्या वागणुकीवर ताशेरे ओढताना म्हटले की, "सेटवर अक्षयची ऊर्जा अत्यंत 'टॉक्सिक' (विषारी) असते. 'दृश्यम 2' नंतर त्याला मोठ्या ऑफर्स मिळाल्या, त्याआधी तो कित्येक वर्षे घरी बसला होता. त्याला वाटते की 'धुरंधर' त्याच्यामुळे चालला आहे, पण तो विसरतोय की हे सर्व मल्टीस्टारर चित्रपट आहेत. त्याने स्वबळावर चित्रपट करून 50 कोटी कमावून दाखवावेत."

हेही वाचा – Year Ender 2025: शाहरुख खानचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार, तर आशीष बेंडे यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा सन्मान; 2025 मध्ये चित्रपटसृष्टीतील कोण कोण ठरले राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी?

500 कोटींची स्क्रिप्ट पण ऐनवेळी नकार

चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर अक्षयने स्वतः लेखकाला मिठी मारली होती आणि हा चित्रपट 500 कोटींची कमाई करेल असे म्हटले होते. "शूटिंग सुरू होण्यापूर्वी केवळ 10 दिवस आधी त्याने नकार दिला. आम्ही त्याच्या कपड्यांच्या डिझायनरला पैसे दिले होते, करार झाला होता, पण त्याने ऐनवेळी आमचा विश्वासघात केला," असे पाठक यांनी सांगितले.

हेही वाचा – Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजान सिंगलच; सलमान खानच्या लग्नाबाबत वडिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, ‘त्याची आई…’

अक्षयची जागा आता जयदीप अहलावत घेणार

अक्षय खन्ना बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांनी तातडीने जयदीप अहलावत यांची या भूमिकेसाठी निवड केली आहे. "आम्हाला अक्षयपेक्षा चांगला अभिनेता आणि त्याहूनही चांगला माणूस मिळाला आहे," असे म्हणत निर्मात्यांनी जयदीपचे स्वागत केले आहे. या वादामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत कुमार मंगत यांनी अक्षय खन्नाला कायदेशीर नोटीस धाडली आहे. अक्षयने अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही, परंतु या प्रकरणामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number