BMC Canteen : ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत धागा; मुंबई मनपा मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार

मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

BMC Canteen : ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत धागा; मुंबई मनपा मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार

मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात मिळणाऱ्या ताकाच्या ग्लासात चक्क माशी आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- Ethanol Cooking : LPG ऐवजी इथेनॉलवर होणार स्वयंपाक? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या प्रकरणानंतर मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे. तसेच खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवल्याने आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. दररोज हजारो अधिकारी, कर्मचारी, पोलीस व नागरिकांचा उपहारगृहात वावर होत असतो. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number