Fung-Wong Cyclone 2025: सावधान! सरकारने या ठिकाणी दिलाय मोठ्या वादळाचा इशारा; पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे

या तुफानाने मोठा कहर केला असून बहुतांश मृत्यू उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूस्खलनांमुळे झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2 लोक बेपत्ता आणि 28 जखमी झाले आहेत.

Fung-Wong Cyclone 2025: सावधान! सरकारने या ठिकाणी  दिलाय मोठ्या वादळाचा इशारा; पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे

"मोंथा" वादळाने आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर धडक देत जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा कहर केला. बंगालच्या उपसागरातून आलेले मोंथा वादळ देशाच्या पूर्व किनारपट्टीवर कहर करून नंतर कमजोर झाले. आता भारतानंतर तैवानमध्ये (Taiwan) मंगळवारी सरकारने फंगवॉंग (Fung-wong) वादळाचा इशारा जारी केला असून फंगवॉंगच्या आगमनापूर्वी 3000 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे वादळ जरी आता काहीसे कमजोर झाले असले तरी तैवानच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागानुसार फंगवॉंग बुधवारी तैवानच्या नैऋत्य किनाऱ्यावर विशेषतः काओशुंग (Kaohsiung) बंदर शहराजवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. हे वादळ यापूर्वी फिलिपिन्स (Philippines) मधून गेले असून तिथे त्याने मोठे नुकसान केले आणि 18 जणांचा मृत्यू झाला. तैवानमधून पुढे ते पूर्व किनाऱ्यावरून प्रशांत महासागरात (Pacific Ocean) प्रवेश करेल अशी शक्यता आहे.

हेही वाचा: Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अफवा; ईशा देओल व हेमा मालिनी यांनी सांगितली खरी माहिती

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते (Lai Ching-te) यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की नागरिकांनी डोंगराळ भागात किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ जाणं टाळावं आणि सुरक्षित ठिकाणीच राहावं. त्यांनी सांगितले की अगदी लहान धोका वाटला तरी खबरदारी घ्यावी कारण काही महिन्यांपूर्वी ह्याच भागात मोठा पूर आला होता. सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका तुफानात ह्वालियेन (Hualien) भागात 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या वेळी प्रशासनाने आधीच तयारी केली असून गुआंगफू (Guangfu) शहरात आणि इतर चार जिल्ह्यांमध्ये 3337 नागरिकांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ह्वालियेन आणि त्याच्या शेजारच्या यिलान (Yilan) जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा व कार्यालये बंद ठेवण्यात आली, तर उत्तरेकडील हिन्स्चू (Hsinchu) शहरात जिथे टीएसएमसी (TSMC – Taiwan Semiconductor Manufacturing Company) चे कारखाने आहेत, वादळाचा थेट परिणाम होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

फिलिपिन्समध्ये या तुफानाने मोठा कहर केला असून बहुतांश मृत्यू उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूस्खलनांमुळे झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2 लोक बेपत्ता आणि 28 जखमी झाले आहेत. तैवान प्रशासनाने जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले असून बचाव पथकं आणि आपत्कालीन सेवा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आल्या आहेत. पुढील 48 तास तैवानसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा: Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर दिल्लीसह देशातील या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number