Shweta Tiwari Thanks Raj Thackeray MNS for Action against Online Abuse: टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर महिलांविरोधात होणाऱ्या ऑनलाईन शिवीगाळ आणि ट्रोलिंगविरुद्ध आवाज उठवला होता. आक्षेपार्ह भाषेत मेसेज करणाऱ्या काहींच्या प्रोफाईलवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे फोटो आणि मजकूर आढळल्याने श्वेताने त्यांच्यावर थेट निशाणा साधला होता. अशा अश्लील कमेंट्स करणाऱ्या समर्थकांचे वर्तन पक्षाला मान्य आहे का, असा थेट सवाल तिने राज ठाकरेंना विचारत संबंधित युझर्सचे स्क्रीनशॉट्स इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
मनसेच्या नेत्या स्नेहल अडारकर यांची तत्पर मध्यस्थी व कृती
श्वेता तिवारीने सार्वजनिकरीत्या प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या अॅड. स्नेहल अडारकर यांनी तातडीने तिच्याशी संपर्क साधला. महिलांविरोधातील असे वर्तन पक्ष कधीही सहन करणार नाही, हे स्पष्ट करत त्यांनी तपासासाठी 3 दिवसांची मुदत मागितली. तपासणी अंती, ऑनलाईन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींचा मनसे पक्षाशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याचे समोर आले.
हेही वाचा – Sunil Pal: आता समयने काय केलं? कॉमेडियन सुनील पाल संतापले; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, ‘अशा लोकांना…
3 दिवसांत हस्तलिखित माफीनामा व थेट संपर्क क्रमांक सुपूर्द
मनसेच्या टीमने अवघ्या 3 दिवसांत संबंधित ट्रॅकरचा शोध घेऊन त्याचा मोबाईल नंबर आणि त्याने स्वतःच्या हाताने लिहिलेले माफीपत्र मिळवले. हे सर्व पुरावे आणि माफीनामा स्नेहल अडारकर यांनी श्वेता तिवारीकडे सुपूर्द केले. पक्षाचा कोणताही संबंध नसतानाही मनसेने दाखवलेली ही तत्परता आणि महिलांच्या सन्मानासाठी घेतलेली ठाम भूमिका श्वेता तिवारीला विशेष भावली.
'राज ठाकरेजी, थँक्यू!'; श्वेताने मांडली ऑनलाईन सुरक्षेची खरी समस्या
मिळालेला हस्तलिखित माफीनामा सोशल मीडियावर शेअर करत श्वेता तिवारीने मनसेच्या कारवाईचे कौतुक केले. 'महिलांवरील अत्याचार आणि छळ मनसे खपवून घेत नाही हे यावरून सिद्ध झाले; राज ठाकरेजी, थँक्यू!' अशा शब्दांत तिने आभार मानले. यासोबतच, ही समस्या केवळ 1-2 लोकांपुरती मर्यादित नसून पडद्याआड लपून महिलांना शिवीगाळ करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध तंत्रज्ञान कंपन्यांनी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले.