SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी रात्री बंद राहणार UPI सेवा; बँकेने जारी केला अलर्ट

या कालावधीत नियमित यूपीआयद्वारे कोणतेही डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार नसल्याने रात्रीच्या वेळी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी रात्री बंद राहणार UPI सेवा; बँकेने जारी केला अलर्ट

SBI Alert: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सिस्टीमच्या नियोजित देखभालीच्या (System Maintenance) कामासाठी बँकेची UPI सेवा 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे. 4 सप्टेंबर 2026 च्या रात्री 12:15 ते 1:00 वाजेपर्यंत ही सेवा सुमारे 45 मिनिटांसाठी प्रभावित राहील. या कालावधीत नियमित यूपीआयद्वारे कोणतेही डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार नसल्याने रात्रीच्या वेळी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

लहान पेमेंटसाठी UPI Lite सुरू; मोठ्या ऑनलाईन व्यवहारांवर परिणाम
बँकेने स्पष्ट केले आहे की देखभालीचे काम सुरू असताना लहान स्वरूपाच्या डिजिटल व्यवहारांसाठी 'UPI Lite' सेवा सुरू राहील, त्यामुळे ग्राहकांची पूर्णपणे कोंडी होणार नाही. मात्र, नियमित UPI द्वारे होणारे मोठे व्यवहार या काळात पूर्ण होणार नाहीत. हे काम निर्धारित वेळेच्या आधीही पूर्ण होऊ शकते; तरीही ग्राहकांनी होणारा संभाव्य खोळंबा टाळण्यासाठी आपली सर्व महत्त्वाची ऑनलाईन पेमेंट्स वेळेआधीच पूर्ण करून ठेवावीत, असा सल्ला बँकेने दिला आहे.

हेही वाचा – Mumbai-Pune Bullet Train: प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! मुंबई-पुणे बुलेट ट्रेनची रेल्वेमंत्र्यांकडून घोषणा; 238 नव्या एसी लोकल धावणार..

ग्राहकांनी आगाऊ नियोजन करण्याचे बँकेचे आवाहन
रात्रीच्या वेळेत होणारी डिजिटल पेमेंटची गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी योग्य वेळेची नोंद घेणे गरजेचे आहे. स्टेट बँकेच्या या तांत्रिक कामामुळे दैनंदिन ऑनलाईन व्यवहारांवर तात्पुरता परिणाम होणार असल्याने, विशेषतः वैद्यकीय किंवा आणीबाणीच्या कामांसाठी होणारी मोठी पेमेंट्स आधीच करून ठेवण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number