Samantha Ruth Prabhu wedding : लाल साडी, केसात गजरा! अन् समांथाचा दणक्यात पार पडला विवाह; पाहा ‘हे’ खास क्षण

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू ही तिच्या घटस्फोटानंतर नेहमी चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. तिचा लग्नसमारंभ नुकताच पार पडला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Samantha Ruth Prabhu wedding : लाल साडी, केसात गजरा! अन् समांथाचा दणक्यात पार पडला विवाह; पाहा ‘हे’ खास क्षण

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा प्रभू ही तिच्या घटस्फोटानंतर नेहमी चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. तिचा पहिला पती नागा चैतन्य याच्यासोबत वेगळी झाल्या नंतर तिच नाव द फॅमिली मॅन सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरू याच्यासोबत जोडल जात होत. एवढचं नव्हे तर दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. त्यामुळे हे दोघे एकामेकाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

हेही वाचा- Suraj Chavan Wedding : सूरजच्या लग्नात गोंधळ; जान्हवी किल्लेकरचा थेट पाहुण्यांना दम, ‘मी हात जोडते’

त्यानंतर आता समांथाच्या एका पोस्टने सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. समांथा आणि दिग्दर्श राज निदिमोरू हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. या जोडप्याने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सामंथा आणि राज निदिमोरू यांचा विवाह कोइम्बतूर येथील ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात खासगी पद्धतीने पार पडला. या लग्नाला जवळच्या केवळ 30 लोकांना बोलावण्यात आले होते.

हेही वाचा- Lin Laishram Pregnancy News: रणदीप हुडाचे चाहत्यांना सरप्राईज! लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शेअर केली गुड न्यूज

समांथाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 01.12.2025 असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. राज आणि समांथाची पहिली व्यावसायिक भेट 2021 मध्ये “द फॅमिली मॅन” सीझन 2 दरम्यान झाली. 2024 पासूनच समांथा आणि राज यांच्या जवळीकतेच्या अफवा पसरू लागल्या. त्यांच्या वारंवार इंस्टाग्राम संवादांमुळे आणि शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली. 

यावेळी समांथाने लाल रंगाची जरीकामाने सजवलेली रेशमी साडी परिधान केली होती. तसेच यावर तिने सोन्याचे दागिने परिधान केले होते, ज्यामुळे तिला पारंपारिक शाही लूक येत होता. तसेच तिने केसात गजरा माळला होता ज्यामुळे तिच्या सौदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेतल जात आहे. तर दुसरीकडे राज निदिमोरूने पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि बेज रंगाच्या नेहरू जॅकेटमध्ये सुंदर दिसत होते. हा छोटासा पण हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number