Retd. Air Marshal Jitendra Mishra: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नायकाकडे अयोध्येतील राम मंदिराची जबाबदारी; राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEOचे पुणे कनेक्शन

मंदिराचा संपूर्ण प्रशासकीय व आर्थिक कारभार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी ही नवी जबाबदारी जितेंद्र मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Retd.  Air Marshal Jitendra Mishra: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नायकाकडे अयोध्येतील राम मंदिराची जबाबदारी; राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEOचे पुणे कनेक्शन

Ram Mandir Trust CEO Jitendra Mishra: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. मंदिराचा संपूर्ण प्रशासकीय व आर्थिक कारभार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी ही नवी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच अयोध्येतील मदन मोहन पांडेय, शिकोहाबादच्या निर्मला यादव आणि दिल्लीचे महेश भगचंदका या तिघांची नवे विश्वस्त (Trustees) म्हणून निवड झाली आहे.

पुण्याच्या NDA चे माजी विद्यार्थी अन् तब्बल 39 वर्षांची प्रदीर्घ देशसेवा
जितेंद्र मिश्रा यांचा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याशी अत्यंत घट्ट संबंध आहे. त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) मधून आपले लष्करी शिक्षण पूर्ण केले आहे. 1986 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून रुजू झालेल्या मिश्रा यांनी तब्बल 39 वर्षे देशसेवा केली. आपल्या सेवाकाळात त्यांनी 3000 तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव मिळवला. ते 30 एप्रिल 2026 रोजी वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले.

हेही वाचा – मुसळधार पावसाचा फटका, भिंत कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; पुढील 24 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी

'ऑपरेशन सफेद सागर', टायगर हिल अन् 'ऑपरेशन सिंदूर'मधील शौर्य
जितेंद्र मिश्रा हे केवळ एक कसलेले फायटर पायलटच नसून एक निष्णात टेस्ट पायलट देखील आहेत. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान 'ऑपरेशन सफेद सागर' अंतर्गत मिराज-2000 विमानांवर लेझर-गायडेड बॉम्ब बसवण्याच्या आणि टायगर हिलवरील हल्ल्याच्या नियोजनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. याशिवाय त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व करत हवाई मोहिमांचे यशस्वी संचालन केले. HAL मध्ये कार्यरत असताना सुखोई-30 MKI विमानांमध्ये 'ब्रह्मोस क्षेपणास्त्र' समाविष्ट करण्याच्या आव्हानात्मक प्रकल्पाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

सर्वोच्च सैनिकी सन्मानांनी सन्मानित; प्रशासनात अनुभवाचा फायदा
त्यांच्या असामान्य लष्करी सेवेबद्दल आणि धोरणात्मक योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल (SYSM), अति विशिष्ट सेवा मेडल (AVSM) आणि विशिष्ट सेवा मेडल (VSM) या सर्वोच्च सैनिकी सन्मानांनी भूषवण्यात आले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या 'गरुड IV' या बहुराष्ट्रीय सरावात त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. आता त्यांच्या चार दशकांच्या शिस्तबद्ध लष्करी आणि प्रशासकीय अनुभवाचा उपयोग अयोध्येतील राम मंदिराचे नियोजन, सुरक्षा आणि भक्त व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी होणार आहे.

हेही वाचा – PM Modi Photo Controversy: पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून मनसे-भाजपमध्ये जुंपली; 'शिवतीर्थ'बाहेर तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number