Retail Inflation: महागाईचा भडका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 4.82 टक्क्यांवर; कांदा, आले-लसणाच्या दरवाढीने सर्वसामान्य हवालदिल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निश्चित केलेल्या 4 टक्के या मध्यम मुदतीच्या लक्ष्यापेक्षा महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यात अधिक नोंदवला गेला आहे.

Retail Inflation: महागाईचा भडका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 4.82 टक्क्यांवर; कांदा, आले-लसणाच्या दरवाढीने सर्वसामान्य हवालदिल

4.82 Percent Retail inflation India in August 2026: देशातील किरकोळ महागाईच्या दराने (Retail Inflation) पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून ऑगस्ट महिन्यात हा दर 4.82 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्यात 4.45 टक्के असलेला हा दर आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निश्चित केलेल्या 4 टक्के या मध्यम मुदतीच्या लक्ष्यापेक्षा महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यात अधिक नोंदवला गेला आहे. यापूर्वी मे महिन्यात हा दर 3.93 टक्के होता, तो जूनमध्ये 4.38 टक्के आणि जुलैमध्ये 4.45 टक्के असा सातत्याने वाढत गेला आहे.

खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ; ग्रामीण भागात जास्त फटका
ऑगस्ट महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) वर आधारित अन्न महागाई दर 5.95 टक्क्यांवर पोहोचला, जो जुलैमध्ये 5.52 टक्के होता. या महागाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसला आहे:
ग्रामीण भाग: ग्रामीण क्षेत्रातील अन्न महागाई दर 6.13 टक्क्यांवर तर एकूण किरकोळ महागाई दर 5.23 टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरी भाग: शहरांमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.64 टक्के राहिला असून एकूण शहरी महागाई दर 3.96 टक्क्यां वरून वाढून 4.31 टक्के झाला आहे.

हेही वाचा – BRICS चा मास्टरस्ट्रोक! अमेरिकेला थेट न दुखावता डॉलरच्या वर्चस्वाला सुरुंग लावणारा 'सायलेंट प्लॅन'; व्यापाराबाबत हा मोठा निर्णय

कांदा, आले आणि लसूण कडाडले; सोन्या-चांदीचे दरही वधारले
नित्य उपयोगी भाज्या आणि मसाल्यांच्या पदार्थांमधील दरवाढीने स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे बिघडवले आहे. वर्षभरात आल्याचे दर तब्बल 73.82 टक्क्यांनी वाढले आहेत, तर कांद्याच्या दरात 48.27 टक्के आणि लसणाच्या दरात 43.60 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी टोमॅटो 31.09 टक्क्यांनी आणि बटाटे 13.14 टक्क्यांनी स्वस्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. याशिवाय रेस्टॉरंट व हॉटेल सेवा (8.38 टक्के), वाहतूक (4.60 टक्के) आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमतीतील (चांदीचे दागिने 107.11 टक्के व सोने-हिरे 35.53 टक्के) वाढीमुळे इतर सेवाही महागल्या आहेत.

ऑक्टोबरमधील आरबीआयच्या पतधोरण बैठकीवर राहणार सर्वांचे लक्ष
आरबीआयच्या (RBI) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) पुढील महत्त्वपूर्ण बैठक 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या बैठकीपूर्वी आलेला हा महागाईचा आकडा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑगस्ट महिन्यातील बैठकीत आरबीआयने रेपो रेट (Repo Rate) 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवत 'न्यूट्रल' धोरण स्वीकारले होते. आता खाद्यपदार्थांची झालेली ही दरवाढ आणि महागाईचा वाढता आलेख लक्षात घेता, आगामी बैठकीत व्याजदरांबाबत आरबीआय काय कठोर निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Sugar Price: गणेश भक्तांसाठी गोड बातमी! साखरेचे दर कोसळले, नवीन दर काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number