Rashmika-Vijay Wedding: रश्मिका-विजयच्या लग्नाची जय्यत तयारी; निमंत्रण पत्रिकेसोबत पाहुण्यांना मिळणार ‘जम्बो गिफ्ट बॉक्स’

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचा निमंत्रण बॉक्स अत्यंत सुंदर दिसत आहे. पिवळ्या झेंडू आणि गुलाबी पीस लिलीच्या डिझाइनने सजवलेल्या या बॉक्समध्ये काही खास भेटवस्तू आहेत.

Rashmika-Vijay Wedding: रश्मिका-विजयच्या लग्नाची जय्यत तयारी; निमंत्रण पत्रिकेसोबत पाहुण्यांना मिळणार ‘जम्बो गिफ्ट बॉक्स’

Rashmika-Vijay Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं जोडपं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. हे जोडप येत्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आणि त्यासोबतचा भव्य 'गिफ्ट बॉक्स' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जरी या दोघांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. 

गिफ्ट बॉक्समधील खास वस्तू आणि ब्रँड्सची झलक
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचा निमंत्रण बॉक्स अत्यंत सुंदर दिसत आहे. पिवळ्या झेंडू आणि गुलाबी पीस लिलीच्या डिझाइनने सजवलेल्या या बॉक्समध्ये काही खास भेटवस्तू आहेत. यात रश्मिकाच्या 'डियर डायरी' ब्रँडचा परफ्यूम, विजयच्या 'राउडी' फॅशन ब्रँडचा पिवळा टी-शर्ट, सोन्याचा वर्ख असलेला 'सोन घी रोल'चा बॉक्स, आयुर्वेदिक हँड आणि फूट क्रीम आणि भाजलेले काजू यांचा समावेश आहे. या वस्तूंमधून दोन्ही स्टार्सच्या वैयक्तिक ब्रँड्सचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे.

हेही वाचा – Siddharth Malhotra Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केले दु:ख

खाजगी विवाह सोहळा आणि भव्य रिसेप्शन
व्हायरल निमंत्रण पत्रिकेनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी एका अत्यंत खाजगी समारंभात हे जोडपे लग्न करेल. या कार्डवर विजयचा एक भावनिक संदेशही आहे. लग्नानंतर, 4 मार्च 2026 रोजी हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील 'ताज कृष्णा' या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्याला दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

फुलांनी सजलं घर; चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
लग्नाच्या पूर्वतयारीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये विजय आणि रश्मिकाचे घर फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघालेले दिसत आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येत आहे. 'विजय-रश्मिका'च्या या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांचे लाखो चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number